Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता

Rain Forecast: राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या जोरात वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण, विदर्भ आणि घाटमाथा परिसरात मुसळधार सरी पडतील, तर मराठवाड्यात फक्त काही ठिकाणीच पावसाची हजेरी लागणार आहे.

Anil Jadhao 

Pune News: कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मात्र, इतर भागात पावसाचा जोर कमीच आहे. हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. 

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच माॅन्सून ट्रफ आपल्या सर्वसाधारण जागेवर आहे. दक्षिण पश्चिम बंगाल आणि शेजारच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम वायव्य भागाकडे सरकून झारखंड आणि उत्तर छत्तीसगड पार करण्याची शक्यता आहे.

हा ट्रफ दक्षिण राजस्थान ते दक्षिण पश्चिम बंगाल आणि शेजारच्या परिसरावर आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवस दक्षिण पश्चिम बंगाल, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ आणि ओडिशाच्या अंतर्गत भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

राज्यातील काही भागात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक राहील, अशी शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातही काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. पुर्व विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. 

मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT