Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Heavy Rain: विदर्भ, कोकणात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात कमी पावसाची शक्यता

Heavy Rain Forecast: राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच आहे. कालपासून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पुढील ५ दिवस कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच आहे. कालपासून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पुढील ५ दिवस कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

कोकणात आज पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्या कोकण आणि घाटमाथ्यावर काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावतील, नागपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. 

कोकणात बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारीही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. गुरुवारी गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

तसेच बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. शुक्रवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT