Rain Alert Agrowon
हवामान

Monsoon Rain 2025: कोकणात मुसळधारेचा अंदाज; विदर्भ, खानेदशातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Heavy Rainfall Alert: दोन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मान्सूनने राज्यात आणि देशात वेग पकडला आहे. हवामान विभागानुसार, पुढील ५ दिवस कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि खानदेशात जोरदार पावसाची शक्यता असून, काही जिल्ह्यांत ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनने दोन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज देशाच्या आणखी काही भागात प्रगती केली. देशाचा अगदी थोड्या भागात माॅन्सून पोचला नाही. तर विदर्भ, कोकण, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

राज्यातील अनेक भागात पुढील ५ दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणातील बहुतांशी भागात पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ट्रात या काळात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. मात्र घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. 

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. खानदेशातील ३ जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पुढील ३ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाची काही ठिकाणी शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. 

माॅन्सूनने आजही देशाच्या काही भागात प्रगती केली. माॅन्सूनने उत्तर अरबी समुद्राचा आणि हिमाचल प्रदेश तसेच जम्मुचा उरलेला भाग व्यापला. तर पश्चिम उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग, हरियानाचा आणखी काही भाग, चंदीगडचा आणखी काही भाग आणि पंजाबचा आणखी काही भाग माॅन्सूनने व्यापला. 

माॅन्सूनची सिमा आज बारमेर, जोधपूर, जयपूर, आग्रा, रामपूर, बिजनोर, कर्नाल आणि हलवारा भागात होती. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील ३६ तासांत माॅन्सून राजस्थान, पंजाब आणि हरियानाच्या काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे. तर पश्चिम उत्तर प्रदेशाचा उरलेला भागही माॅन्सून व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Price Hike : युरिया-एलएनजी दरवाढीने वाढली चिंता; खत अनुदानाचा बोजा दुप्पट होणार?

Onion Farmers Protest: कांदा उत्पादकांचा आक्रोश, चांदवडमध्ये महामोर्चा, रस्त्यावर कांदे फेकले, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Goat Farming Management: नियोजनबद्ध शेळीपालनात आरोग्य, खाद्य व्यवस्थापनावर भर

Livestock Methane Emission Management: पशुधनातील मिथेन वायू उत्सर्जनाची कारणे अन् उपाय

Farmer Loan Waiver : तामिळनाडू सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; १४.२२ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT