Monsoon Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

Rain Forecast : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News : कमी दाब क्षेत्र, मॉन्सूनचा आस, किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा पूरक ठरल्याने राज्यात मॉन्सून सक्रिय झाला आहे. आज (ता. ४) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता कायम आहे. कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून अजमेर, ग्वालियर, सिधी, तीव्र कमी दाबाचे केंद्र (डिप्रेशन) ते बंकुरा, कॅनिंग ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते मध्य केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या प्रणालींमुळे कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे.

शनिवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये घाटमाथ्यावरील दावडी येथे उच्चांकी २०० मिलीमीटर, शिरगाव येथे १८०, ताम्हिणी येथे १७०, अंबोणे १६० मिलीमीटर, भिरा १४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते सरी पडत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून, आज (ता. ४) पालघरसह पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' आहे. तर उर्वरित कोकणासह नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दोन कमी दाब क्षेत्र ठरणार पावसाला पूरक

पश्चिम बंगाल आणि झारखंड परिसरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. बिहार आणि झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या या प्रणालीचे केंद्र उत्तराखंडच्या दाल्तोंगज पासून ५० किलोमीटर ईशान्येकडे, बिहारच्या देहरी पासून ६० किलोमीटर दक्षिणेकडे, उत्तर प्रदेशच्या चूर्कपासून १४० किलोमीटर आग्नेयेकडे १४० किलोमीटर अंतरावर होते. ही प्रणाली मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. यातच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर हवेचे कमी दाब क्षेत्र तयार झाले असून, त्याला लागून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या दोन्ही प्रणाली पावसासाठी पूरक ठरणार आहेत.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

पालघर, पुणे, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोल्हापूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT