Rain  Agrowon
हवामान

Maharashtra Weather Alert: विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

Monsoon Update: आज (ता. ८) विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात सर्वदूर कमी अधिक पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ८) विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण पश्चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली झारखंड आणि छत्तीसगडकडे येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगरपासून, सिरसा, मेरठ, वाराणसी, दाल्टोंगंज, पुरूलिया, कमी दाबाचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये पूर्वेकडून ७५ नॉट्स वेगाने वाहणाऱ्या उष्णकटीबंधीय वारे वाहत आहेत. दक्षिण गुजरात आणि दक्षिण कर्नाटक किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. या प्रणाली पूरक ठरल्याने राज्यात पाऊस वाढला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथ्यावर अतिवृष्टी होत आहे. विदर्भातही पावसाचा जोर वाढल्याने मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. सोमवारी (ता. ७) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सर्वाधिक १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच सोलापूर येथे पावसाची दडी कायम असल्याने राज्यातील उच्चांकी ३३.७ अंश तापमानाची नोंदले गेले.

आज (ता. ८) विदर्भातील अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तसेच रत्नागिरी, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

सोमवारी (ता. ७) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२७.२---२२.३

अहिल्यानगर---निरंक---२२.५

‎‎धुळे---३०.०---२१.०

जळगाव---२८.४---२३.२

जेऊर---३१.०---२०.५

‎‎कोल्हापूर---२६.६---२२.६

‎महाबळेश्वर---१९.०---१७.५

मालेगाव---२८.८---२१.०

‎‎नाशिक---२५.३---२१.८

‎निफाड---२६.८---२२.२

‎सांगली---२९.२---२२.३

‎सातारा---२७.२---२२.०

‎सोलापूर---३३.७---२३.८

‎सांताक्रूझ---२९.९---२५.८

डहाणू---२७.५---२४.८

‎रत्नागिरी---३०.०---२५.१

‎छत्रपती संभाजीनगर---२८.४---२१.८

‎धाराशिव---३०.४---२१.६

‎परभणी---३१.७---२२.८

परभणी (कृषी)---३१.७---२२.८

‎‎अकोला---२९.४---२४.०

अमरावती---२८.०---२१.९

‎भंडारा---२८.०---२१.०‎‎

बुलडाणा---२७.६---२१.६

‎ब्रह्मपुरी---२९.२---२३.९

‎चंद्रपूर---२८.८---२३.४

‎गडचिरोली---२८.४---२३.२

‎गोंदिया---२६.८---२३.६

‎नागपूर---२९.४---२४.०

‎वर्धा---२८.८---२३.६

‎वाशीम---२८.०---२१.६

‎यवतमाळ---२७.०---२२.०

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रत्नागिरी, सातारा घाटमाथा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, हिंगोली, नांदेड.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT