Rain Alert Agrowon
हवामान

Vidarbha Rain Alert: विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: राज्यात मे अखेरीस झालेल्या पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली. आता अरबी समुद्रातून मॉन्सूनची गती मंदावल्याने उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरतोय. मात्र, विदर्भात आज (ता. ३०) पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: मे महिन्याच्या पावसाने राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मात्र मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरण्याचे संकेत देण्यात आले आहेत. आज (ता. ३०) विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

‎बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या प्रणालीची तीव्रता वाढल्याने या भागात वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) सक्रिय आहे. गुरुवारी (ता. २९) दुपारी ही प्रणाली बांगलादेशातील सागर बेटे आणि खेपूपारा जवळ जमिनीवर आली आहे. या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरणार आहे. गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उर्वरित उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

आज (ता. ३०) विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्रातून मॉन्सूनची चाल मंदावली

बंगालच्या उपसागरातून मॉन्सूनने चाल केली आहे. मात्र अरबी समुद्रातून मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबादपर्यंत सीमा कायम होती. गुरुवारी (ता. २९) विदर्भासह, छत्तीसगड, ओडिशाच्या काही भागात, संपूर्ण पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. पूर्व भारतात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती असून, महाराष्ट्रातील पुढील प्रगतीसाठी वाट पहावी लागणार आहे.

गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :

कोकण : अंबरनाथ, उल्हासनगर प्रत्येकी ५०, ठाणे, कल्याण, म्हसळा प्रत्येकी ४०, सांताक्रूझ, ठाणे, भिवंडी, मुरबाड, कुलाबा, मुरूड, राजापूर, श्रीवर्धन, कर्जत, माथेरान, पेन प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर ७०, धुळे ५०, कळवण ४०, निफाड, पिंपळगाव बसवंत, इगतपुरी, वेल्हे, बार्शी, देवळा प्रत्येकी ३०.

मराठवाडा : लोहारा २०, उमरगा, भूम, वाशी प्रत्येकी १०.

विदर्भ : आमगाव, कामठी प्रत्येकी ७०, नरखेडा, मौदा प्रत्येकी ४०, हिंगणा ३०.

गुरुवारी (ता. २९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२९.२---२३.७

अहिल्यानगर---२८.८---२३.४

‎‎धुळे---२८.५---१८.८

जळगाव---२८.६---२४.३

‎जेऊर---३२.०---२०.५

‎कोल्हापूर---२६.९---२२.२

‎महाबळेश्वर---२१.१---१६.५

मालेगाव---३५.६---२२.८

‎‎नाशिक---२७.३---२३.०

‎निफाड---२८.४---२३.०

‎सांगली---२८.६---२२.४

‎सातारा---२९.८---२३.२

‎सोलापूर---३१.८---२४.९

‎सांताक्रूझ---३१.८---२३.०

डहाणू---३३.६---२५.०

‎रत्नागिरी---२९.६---२३.७

‎छत्रपती संभाजीनगर---३०.०---२३.४

‎धाराशिव---२८.४---२१.६

‎परभणी---२८.४---२४.५

‎परभणी (कृषी)---२८.२---२४.२

‎अकोला---३२.०---२५.६

अमरावती---३२.८---२३.५

बुलडाणा---३४.०---२३.९

‎ब्रह्मपुरी---३४.०---२३.९

‎चंद्रपूर---३३.६---२५.६

‎गडचिरोली---३२.२---२४.०

‎गोंदिया---३४.६---२३.०

‎नागपूर---३५.९---२३.५

‎वर्धा---३२.०---२५.४

‎वाशीम---२८.६---निरंक

‎यवतमाळ---२९.२---२५.०

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Loss Crisis: इंदापूर तालुक्यात पावसाचा पिकांना फटका

Farm Loan Waiver Report: कर्जमाफी समितीचा अहवाल जाहीर करा: किसान सभा

Dairy Prouducts Fraud: पनीरऐवजी ॲनॉलॉग चीज विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आदेश

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाणे भारतात महाग कसे? विजय जावंधिया यांचा पंतप्रधान मोदींना सवाल

Fertilizers Linking Issue: खतांचे लिंकिंग रोखण्यासाठी उत्तर प्रदेशप्रमाणे धोरण राबवावे: ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

SCROLL FOR NEXT