Weather Forecast
Weather Forecast Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाल्याने कोकण घाटमाथ्यावर मॉन्सून सक्रिय आहे. कोकणात पावसाचा जोर कायम असून, उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. ३०) कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकणात जोरदार पावसाची, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून वायव्य उत्तर प्रदेशातील चक्राकार वाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. महाराष्ट्राचा मध्य भागात पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र सक्रिय आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

देशाच्या बहुतांश भागात मॉन्सून पोचला

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. २९) उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. देशाच्या बहुतांश भागात मॉन्सून पोहोचला असून, राजस्थानच्या आणखी काही भागासह हरियाना, पंजाब, चंडीगड, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशाच्या उर्वरित भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, पुणे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, सातारा.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

१०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाणे : हर्णे १००, रत्नागिरी १०२ (जि. रत्नागिरी), भिवंडी १०७ (जि. ठाणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zero Tillage Technique : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात वाहते शून्य मशागत तंत्राचे वारे

Crop Insurance : पीकविम्यासाठी अंतिम मुदतीची वाट पाहू नये

Crop Competition : खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा

Farmers Protest : कर्जमाफी, पीकविमा भरपाईसाठी ‘रास्ता रोको’

Jackfruit Research : फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT