Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rainfall: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon Rain: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून कोकण व घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अमोल कुटे

Pune News: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. आज (ता. ३) कोकण, घाटमाथ्यासह पावसाचा जोर वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार सरी तसेच विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेरपासून शिवपुरी, सिधी, चैबासा, दिघा ते पूर्वमध्ये बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. आग्नेय राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. बुधवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर आणि जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३२ अंश तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ३) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिकच्या घाटमाथ्यावर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

बुधवारी (ता. २) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२८.३---२२.४

अहिल्यानगर---२७.८---२३.४

‎‎धुळे---३१.०---२०.८

जळगाव---३२.०---२४.६

जेऊर---३०.५---२०.५

‎‎कोल्हापूर---२५.९---२२.१

‎महाबळेश्वर---१९.६---१८.०

मालेगाव---२९.४---२२.८

‎‎नाशिक---२७.२---२१.७

‎निफाड---३०.०---२१.८

‎सांगली---२६.७---२२.७

‎सातारा---२६.५---२२.६

‎सोलापूर---३२.०---२४.०

‎सांताक्रूझ---३१.२---२६.५

डहाणू---२९.४---२४.६

‎रत्नागिरी---३१.०---२४.७

‎छत्रपती संभाजीनगर---२९.०---२३.१

‎धाराशिव---२९.१---२०.४

‎परभणी---२८.९---२२.४

परभणी (कृषी)---२९.५---२३.०

‎‎अकोला---२९.८---२४.४

अमरावती---२७.६---२२.४

‎भंडारा---२६.२---२१.०‎‎

बुलडाणा---२६.७---२३.६

‎ब्रह्मपुरी---२६.४---२४.०

‎चंद्रपूर---२८.०---२४.०

‎गडचिरोली---२७.४---२३.०

‎गोंदिया---२६.५---२३.६

‎नागपूर---२९.२---२३.८

‎वर्धा---२९.०---२४.५

‎वाशीम---२६.६---२२.६

‎यवतमाळ---२७.२---२३.०

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक घाटमाथा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT