Rain Update  Agrowon
हवामान

Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस शक्य

Weather News : विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Team Agrowon

Weather Forcasting : पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) अडखळलेली वाटचाल सुरू होण्यास पोषक हवामान होत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. २०) कोकणातील जिल्हे आणि पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरीतील हर्णे येथे ९०, पालघरमधील डहाणू येथे ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्याच्या बऱ्याचशा भागात पावसाने उसंत घेतली असून, खानदेश विदर्भात मॉन्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे.

पावसाची उघडीप असलेल्या भागात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. तर उकाडा वाढल्याने घामटा निघत आहे. पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळिशीपार असून, बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४१.३ अंश तापमानाची नोंद झाली. भंडारा, चंद्रपूर, येथे पारा ४० अंशांपार स्थिरावलेला आहे.

आज (ता. २०) कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांतील पाऊस (मिमी) :
कोकण : हर्णे ९०, डहाणू ७०, कुलाबा, सावर्डे ५०, गुहागर, वसई, अलिबाग, भिवंडी प्रत्येकी ४०, मालवण, वाडा, वाकवली, रत्नागिरी, मुरूड प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : भडगाव, गगनवाडा प्रत्येकी ३०, महाबळेश्वर २०, वेल्हे, लोणावळा, तळेगाव, ओझरखेडा, सोलापूर प्रत्येकी १०.

मराठवाडा : मुखेड, देगलूर प्रत्येकी ३०, रेणापूर, किनवट २०.

विदर्भ : गडचिरोली, भवापूर, सेलू, वर्धा, समुद्रपूर, उमरेड प्रत्येकी ३०, पातूर, खारंघा, एटापल्ली, मालेगाव, मूल प्रत्येकी २०, अर्जूनी मोरगाव, हिंगणा, धानोरा, अर्वी, गोरेगाव, सिंदेवाही, मंगरूळपीर, सावनेर, नागभीड प्रत्येकी १०.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.

वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : नांदेडला ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत यंदाही घट

Solar Power : सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये होतेय सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Dairy App: जनावरांचं संपूर्ण नियोजन कसं करावं?

Varkhede Barrage : शेळगाव, वरखेडे प्रकल्पांत जलसंचय यंदाही १०० टक्के अशक्य

SCROLL FOR NEXT