Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पाऊस

Rain Forecast : दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सूनोत्तर पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत.

Team Agrowon

Pune News : दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सूनोत्तर पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. सिंधुदुर्गातील सावंतवाडी, बांदा, मडुरा येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पाऊस पडला. सतत पडत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ लागले आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभवडे येथे ६० मिलिमीटर पाऊस झाला. सिंधुदुर्गातील श्रावण येथे ९६ मिलिमीटर, तर शिरोडा येथे ८२ मिलिमीटर पाऊस पडला असून, तळकट ७६, पडेल, पोइप ७१, आजगाव ६९ मिलिमीटर पाऊस झाला.

या पावसामुळे भात खाचरात पाणी साचत असून, निसवण्याच्या अवस्थेत असलेल्या भात पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. मध्य महाराष्ट्रातही काही अंशी ढगाळ वातावरण असले, तरी दुपारी कडक ऊन पडत आहे.

तर सायंकाळी ढग भरून येत असून, वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. नगरमधील कर्जत येथे २२ मिलिमीटर, तर साताऱ्यातील कराड, मलकाप येथे २० मिलिमीटर, तर कळे २५ मिलिमीटर पाऊस झाला. सांगलीतील कुंडल येथे ५५ मिलिमीटर, पलूस ५५, येळवी ४५, मनेराजुरी ४४, तासगाव, भिलवडी ४० मिलिमीटर पाऊस झाला. कोल्हापुरातील कराडवाडी, गारगोटी येथे ४७ मिलिमीटर, पिंपळगाव ४६, कडेगाव, बिद्री, कूर ४४ मिलिमीटर पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crab Walking Research: खेकडे आडवेच का चालतात? वैज्ञानिकांनी उलगडले २० कोटी वर्षांपूर्वीचे रहस्य

Maharashtra Agriculture Day: वसंतराव नाईक: आदर्शवत लोकनेते

Sahyadri Jamun Honey: संशोधनाने वाढेल मधाचा गोडवा

Farmers Awareness: शेतकऱ्यांनी जैवखते, जैव कीटकनाशकांच्या वापरातून मृदा आरोग्य जपावे : डॉ. प्रसाद

Pune Credit Plan: पुणे जिल्ह्यासाठी ४.६५ लाख कोटींचा पतपुरवठा आराखडा जाहीर

SCROLL FOR NEXT