Weather Update : पुणे : कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनच्या (Monsoon Rain) पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील तालुक्यांत पावसाच्या सरी मागून सरी येत आहेत.
उर्वरित राज्यात मात्र खरिपाच्या पेरण्यांना वेग येण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.
उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक आहे. मुंबई शहरातही पावसाच्या दमदार सरी पडत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे भात रोप पुनर्लागवडीच्या कामांना गती आली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर असलेल्या इगतपुरी आणि परिसरात अतिवृष्टी होत आहे. सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातही जोरदार सरी पडत आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत गुरुवारी (ता. २९) पावसाने चांगली हजेरी लावली.
करवीरच्या पश्चिम भागासह राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगडमध्ये थांबून थांबून पावसाच्या सरी आल्या.सातारा जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा जोर वाढला. दुपारनंतर मध्यम प्रमाणात सरी येत होत्या.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावळी, पाटण, सातारा, कऱ्हाड, वाई तालुक्यांत पूर्व भागाच्या तुलनेत पावसाचा जोर अधिक आहे.
-अकोल्यात उघडीप, नागपूरमध्ये ढगाळ हवामान
- सातारा जिल्ह्यात अधूनमधून जोरदार सरी
- रत्नागिरीत जोरदार पाऊस
- नगर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण
- परभणी, हिंगोली जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ
- कोल्हापूरच्या पश्चिमेकडे पावसाची रिमझिम
- जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात रिपरिप
- नाशिकच्या घोटी, इगतपुरीमध्ये अतिवृष्टी
- पुण्याच्या पश्चिम भागात हलक्या सरी
१५० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे :
पालघर २५०, वाडा १९०, डहाणू १८०, वसई १५०, विक्रमगड १५० (जि. पालघर), ठाणे २००, भिवंडी १८०, उल्हासनगर १७०, अंबरनाथ १६० (जि. ठाणे), श्रीवर्धन १९० (जि. रायगड), कुलाबा १५० (जि. मुंबई शहर), इगतपुरी १६० (जि. नाशिक).
गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांतील पाऊस, (मिलिमीटर) (स्रोत - हवामान विभाग) :
कोकण : पालघर २५०, ठाणे २००, वाडा, श्रीवर्धन प्रत्येकी १९०, डहाणू, भिवंडी प्रत्येकी १८०, उल्हासनगर १७०, अंबरनाथ १६०, कुलाबा, वसई, विक्रमगड प्रत्येकी १५०, मुरूड, उरण, तळा, शहापूर प्रत्येकी १४०, गुहागर १३०, देवगड, सांताक्रुझ, सुधागड पाली प्रत्येकी १२०, कल्याण,
माणगाव प्रत्येकी ११०, दापोली, मुरबाड, मंडणगड, वाकवली, हर्णे, कणकवली प्रत्येकी १००, माथेरान, पनवेल, महाड प्रत्येकी ९०, चिपळूण, पोलादपूर, मालवण, म्हापसा, कर्जत, लांजा, तलासरी, ठाणे, कुडाळ, रत्नागिरी प्रत्येकी ८०.
मध्य महाराष्ट्र : इगतपुरी १६०, महाबळेश्वर ११०, नवापूर, लोणावळा प्रत्येकी ७०, अक्कलकुवा, गगनबावडा प्रत्येकी ६०, हर्सूल ५०, शाहूवाडी, पौड प्रत्येकी ४०, तळोदा ३०, त्र्यंबकेश्वर, पेठ, पिंपळगाव बसवंत, सावळी विहीर, राधानगरी, कोपरगाव, नेवासा प्रत्येकी ३०.
मराठवाडा : पाथरी ३०, वैजापूर, माजलगाव, जिंतूर, मानवत, भूम, गंगापूर, गंगाखेड प्रत्येकी २०.
घाटमाथा : डुंगरवाडी १३०, ताम्हिणी १२०, अंबोणे, भिरा प्रत्येकी १००, शिरगाव, दावडी ९०, कोयना ८०. लोणावळा ६०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.