Rain Prediction Agrowon
हवामान

Rain Forecast : कोकण, घाटमाथा, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

Latest Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र दुसऱ्याच दिवशी निवळून गेले असलेतरी राज्यात पावसाचा जोर वाढण्यास पोषक हवामान होत आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र दुसऱ्याच दिवशी निवळून गेले असलेतरी राज्यात पावसाचा जोर वाढण्यास पोषक हवामान होत आहे.

आज (ता. १८) पूर्व विदर्भातील जिल्ह्यांसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, तसेच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

तर उर्वरित राज्यातही हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. १६) बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंड परिसरावर तयार झालेले कमी दाबाचे सोमवारी (ता. १७) निवळून गेले आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर, सिकार, ओराई, सिधी, अंबिकापूर, बालासोर ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

मध्य महाराष्ट्रात समुद्रसपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र सक्रिय आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाला सुरूवात झाली असून, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे.

आज (ता. १८) पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, तसेच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

उर्वरित कोकण, विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, यवतमाळ, वर्धा.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, वाशीम.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VBG-Ram-ji: ग्रामीण रोजगाराच्या हमीची ऐशी-तैशी

Indian Political Challenges: राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

SCROLL FOR NEXT