Monsoon Agrowon
हवामान

Maharashtra Rain : कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

Monsoon Update : राज्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर कोकणात पावसाची संततधार सुरू आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर कोकणात पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी (ता. ५) सिंधुदुर्गमधील आंबोली, तळकट मंडलात १०८.३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. घाटमाथा, खानदेशात तुरळक ठिकाणी हलका, तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे पिके चांगलीच तरारली आहेत.

कोकणात ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम पाऊस पडला. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग, सावंतवाडीत मुसळधारेने झोडपले आहे. कोयना, शिरगाव, ताम्हिणी, दावडी या घाटमाथ्यावर जोरदार सरी बरसल्या.

तर पुणे, सातारा जिल्ह्यांच्या पश्चिम पट्ट्यांत काही ठिकाणी जोर अधिक होता. पुण्यातील माले मंडलात सर्वाधिक ९३.५ मिलिमीटर, तर मुठे ९३.३, वेल्हा ७०.५, पानशेत ४३ मिलिमीटर पाऊस पडला. साताऱ्यातील महाबळेश्‍वर मंडलात ६३ मिलिमीटर, तर तापोळा ४५, लामज ६१.३ मिलिमीटर पाऊस झाला.

कोल्हापुरातही काही ठिकाणी हलका पाऊस आहे. मराठवाड्यात पोषक स्थिती नसल्याने काहीशी उघडीप दिली आहे. हिंगोलीत हिरडव मंडलात ६१.८ मिलिमीटर पडला. तर परभणी परिसरात रिमझिम पाऊस आहे. विदर्भात अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. नागपुरात जोर काहीसा कमी आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

शुक्रवारचा पाऊस दृष्टिक्षेपात...

नागपूर, अमरावतीत भागात हलका पाऊस.

मराठवाड्यात ढगाळ वातावरण.

परभणी जिल्ह्यात तुरळक सरी.

पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्चिम भागांत हलका ते मध्यम पाऊस.

खानदेशात पावसाची प्रतीक्षा.

कोकणात हलक्या सरी सुरूच.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT