Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert: राज्यात मुसळधारेचा अंदाज; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

IMD Rain Forecast: राज्यातील काही भागात मागील २ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. तर दुसरीकडे अजूनही काही भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील काही भागात मागील २ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. तर दुसरीकडे अजूनही काही भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. पूर्व विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

हवामान विभागाने आज राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.  कोकणातील सर्वच जिल्हे, मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पुणे, नगर, नाशिक तसेच जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसेच धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाण जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

गुरुवारी विदर्भात आणि कोकण तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील चंद्रपूर, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवावाड्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारीही कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहील. तसेच मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT