Summer Heat Agrowon
हवामान

Heat Wave: उन्हाचा चटका पुन्हा वाढला; राज्यातील कमाल तापमानाचा पार ३७ अंशाच्या पार पोचला

Maharashtra Weather Update: राज्यातील तापमानातील वाढ कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील कमाल तापमानात वाढ झाल्याने बहुतांशी भागात चटका वाढला. तर राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानातही वाढ झाली. आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर येथे सर्वाधिक ३७.७ अंश तापमान होते. राज्यातील तापमानातील वाढ कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उत्तरेतील राज्यांमध्येही अनेक भागात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे. नैॡत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

आज पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतातील तापमानातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यातही किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. राज्यातील सकाळचे किमान तापमान १० अंश ते २० अंशाच्या दरम्यान पोचले आहे. तर कमाल तापमानाने अनेक भागात ३६ अंशाचा टप्पा पार केला.

तापमानातील तफावत वाढल्याचा फटका रब्बी पिकांना बसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. राज्यातील तापमानातील वाढ कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT