Summer Heat Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढला ; पारा ३५ अंश पार

Summer Heat : राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने अनेक ठिकाणी पारा पस्तिशी पार पोचला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३६.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने अनेक ठिकाणी पारा पस्तिशी पार पोचला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३६.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता. १२) राज्यातील कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली असून, उत्तर भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १२५ नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत.

मंगळवारी (ता. ११) पंजाबमधील आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १४ ते २३ अंशांच्या दरम्यान आहे.

राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून, मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरीसह विदर्भातील अकोला, वाशीम, अमरावती, चंद्रपूर, वर्धा येथे, तर मध्य महाराष्ट्रातील जेऊर, सोलापूर आणि मराठवाड्यातील परभणी येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. उन्हाच्या झळा वाढत असून, उकाड्यामुळे अंगाची लाही होत आहे. आज (ता. १२) राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३४.८---१५.८

अहिल्यानगर---३३.९---१५.४

धुळे---३४---११.५

जळगाव---३३.९---१५.४

जेऊर---३५.५---१७.५

कोल्हापूर---३३---२०.७

महाबळेश्‍वर---२८.२---१७

मालेगाव---३४.८---१६.२

नाशिक---३३.७---१४.४

निफाड---३३.६---११.३

सांगली---३४.१---१९.७

सातारा---३४.३---१८

सोलापूर---३५.४---२१

सांताक्रूझ---३४.९---१८.८

डहाणू---३१.६---१७

रत्नागिरी---३३.४---२०.२

छत्रपती संभाजीनगर---३४---१८.१

धाराशिव---३२.६---१७.४

परभणी---३५---२१

परभणी (कृषी)---३४.५---१८.२

अकोला---३६.१---१९.७

अमरावती---३५.२---१८.९

भंडारा---३४.०---१९.६

बुलडाणा---३४.१---१९.५

ब्रह्मपुरी---३६.२---१९

चंद्रपूर---३५.२---निरंक

गडचिरोली---३४.२---१७.४

गोंदिया---३३.६---२१.२

नागपूर---३४.८---१९.४

वर्धा---३५.०---१९.८

वाशीम---३५.६---२२.२

यवतमाळ---३४.४---१७

३५ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

ब्रह्मपुरी ३६.२, अकोला ३६.१, वाशीम ३५.६, जेऊर ३५.५, सोलापूर ३५.४, अमरावती ३५.२, चंद्रपूर ३५.२, परभणी ३५, वर्धा ३५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT