Heat Wave Agrowon
हवामान

Maharashtra Heatwave Alert : उन्हाच्या चटक्याने होरपळ वाढली

Weather Update : उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उन्हाच्या चटक्याने होरपळ वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. आज (ता. २१) विदर्भातील नागपूर आणि अकोला येथे उष्ण लाटेचा, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य प्रदेशापासून विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असून, तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे. रविवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर पाठोपाठ अकोला, चंद्रपूर आणि वर्धा येथे ४४ अंश सेल्सिअस, अमरावती, परभणी, यवतमाळ, धुळे आणि मालेगाव येथे ४३ अंश तापमान नोंदले गेले. जळगाव, सोलापूर, गडचिरोली आणि जेऊर येथे ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २१) विदर्भातील नागपूर आणि अकोला येथे उष्ण लाट येण्याची शक्यता आहे, तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तुरळक ठिकाणी विजांसह पावसाला पोषक हवामान आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश, उष्ण हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विदर्भ ठरला देशात उष्ण

उन्हाच्या चटक्यात राज्य अक्षरश: भाजून निघत आहे. रविवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशातील सर्वांत उष्ण दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील सहा शहरांचा समावेश आहे. नागपूर येथे देशातील उच्चांकी ४४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, ब्रह्मपुरी ही शहरे उष्ण ठरली आहेत. राजस्थानातील कोटा, मध्य प्रदेशातील शिवपुरी, सिधी, तेलंगणातील अदिलाबाद या पहिल्या दहा उष्ण शहरात समावेश होता.

रविवारी (ता. २०) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३९.४---२०.०

अहिल्यानगर---निरंक---२३.३

धुळे---४३.०---२८.५

जळगाव---४२.८---२५.०

जेऊर---४२.०---२१.५

कोल्हापूर---३७.१---२३.३

महाबळेश्‍वर---३२.२---२०.७

मालेगाव---४३.०---२५.२

नाशिक---३७.३---२०.९

निफाड---४०.३---१९.२

सांगली---३९.४---२३.७

सातारा---३९.७---२२.४

सोलापूर---४२.८---२७.५

सांताक्रूझ---३३.०---२४.३

डहाणू---३५.२---२३.८

रत्नागिरी---३२.९---२५.१

छत्रपती संभाजीनगर---४१.७---२६.२

धाराशिव---४१.२---२३.४

परभणी---४३.६---२६.०

परभणी (कृषी)---४१.८---२१.४

अकोला---४४.३---२७.६

अमरावती---४३.८---२६.१

भंडारा---४०.०---२५.०

बुलडाणा---४०.०---२७.४

चंद्रपूर---४४.०---निरंक

गडचिरोली---४२.२---२३.६

गोंदिया---४०.६---२४.८

नागपूर---४४.७---२४.०

वर्धा---४४.०---२७.४

वाशीम---४१.८---निरंक

यवतमाळ---४३.५---२७.४

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२३.६---४४.७

मराठवाडा---२३.४---४३.६

पश्‍चिम महाराष्ट्र---२०.०---४२.८

उत्तर महाराष्ट्र---१९.२---४३.०

कोकण---२३.८---३५.२

उष्ण लाटेचा इशारा ( येले अलर्ट) :

अकोला, नागपूर.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड.

विजांसह पावसाची शक्यता :

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT