Summer Temperature Agrowon
हवामान

Heatwave Alert: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा कायम

IMD Warning Summer Heat: राज्यात उन्हाचा पारा वाढत असून, कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना उष्ण, दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी (ता. २४) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.९ अंश तापमानाची नोंद झाली.

अमोल कुटे

Pune News: राज्यात उन्हाच्या झळ्या वाढू लागल्याने कमाल तापमानातील वाढ कायम आहे. सोमवारी (ता. २४) सकाळ पर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३७.६ अंश तापमान नोंदले गेले. आज (ता. २५) कोकणात उष्ण व दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. तर उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

देशातील कमाल तापमानात वाढ होत असून, सोमवारी (ता. २४) आंध्र प्रदेशातील कर्नुल येथे देशातील उच्चांकी ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ३७.९ अंश तापमान नोंदवले गेले. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका अधिक आहे. भंडारा, सांताक्रूझ, जेऊर आणि अकोला येथे पारा ३७ अंशांवर, तर सांगली, यवतमाळ, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे तापमान ३६ अंशांवर होते. दुपारच्या वेळी उन्हाच्या झळांमुळे घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाड्याने घामाच्या धारा वाहत आहेत.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांत पहाटे काहीसा थंडावा जाणवत आहे. सोमवारी (ता. २४) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २५) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा इशारा कायम आहे. राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. २४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३५.७---१४.४

अहिल्यानगर---३५.२---१२.५

धुळे---३४.०---११.६

जळगाव---३४.८---१२.८

जेऊर---३७.०---१४.५

कोल्हापूर---३५.१---२०.३

महाबळेश्वर---३०.९---१८.५

मालेगाव---३४.६---१५.६

नाशिक---३४.५---१४.७

निफाड---३४.२---११.०

सांगली---३६.८---१९.२

सातारा---३५.७---१६.६

सोलापूर---३७.९---१९.१

सांताक्रूझ---३७.२---२१.०

डहाणू---३३.५---१९.६

रत्नागिरी---३५.६---२१.३

छत्रपती संभाजीनगर---३५.०---१७.०

धाराशिव---३५.४---१८.४

परभणी---३५.०---१८.०

परभणी (कृषी)---३४.०---१४.०

अकोला---३७.१---१८.२

अमरावती---३५.६---१६.४

भंडारा---३७.६---१७.४

बुलडाणा---३३.४---१७.९

ब्रह्मपुरी---३६.०---१५.०

चंद्रपूर---३६.०---निरंक

गडचिरोली---३४.०---१५.२

गोंदिया---३२.६---१४.५

नागपूर---३४.६---१६.०

वर्धा---३५.२---१६.८

वाशीम---३५.२---निरंक

यवतमाळ---३६.४---१६.२

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी.

३६ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ३७.९, भंडारा ३७.६, सांताक्रूझ ३७.२, जेऊर ३७, अकोला ३७.१, सांगली ३६.८, यवतमाळ ३६.४, ब्रह्मपुरी ३६, चंद्रपूर ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

Papaya Cultivation Completed: खानदेशात पपई लागवड पूर्ण; जळगावात क्षेत्रवाढ

Onion Prices Issue: कमी दरांमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT