Weather Agrowon
हवामान

Vidarbha Heatwave: विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज

Rain Alert: हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून मराठवाडा व दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्याशा पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील काही दिवस उन्हाचा तीव्र चटका जाणवणार आहे.

Anil Jadhao 

Pune News: मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील अनेक भागात पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. 

धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा अंदाज असून गुरुवार आणि शुक्रवारी उष्ण आणि दमट हवामानाचा देण्यात आला. सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज देण्यात आला.

हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात बुधवारपासून शुक्रवारपर्यंत उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील ५ दिवस उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली. 

विदर्भात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. अकोला जिल्ह्यातील काही भागात आजपासून पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. अमरावती जिल्ह्यातही काही ठिकाणी आजपासून बुधवारपर्यंत उष्णतेची लाट राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून गुरुवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. वर्धा जिल्ह्यात बुधवारी आणि गुरुवार उष्णतेची लाट राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT