Weather Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Weather Update : राज्यातील काही भागात पाऊस तर बहुतांशी ठिकाणी ऊन वाढण्याचा अंदाज दिला. तसेच उष्ण रात्रही राहील, असा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि काही भागात कडक ऊन आहे. रात्रीची उष्णताही असह्य होत आहे. हवामान विभागाने आज आणि उद्याही राज्यातील काही भागात पाऊस तर बहुतांशी ठिकाणी ऊन वाढण्याचा अंदाज दिला. तसेच उष्ण रात्रही राहील, असा अंदाज दिला.

हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. तर ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा ईशारा दिला. 

मराठवड्यातील बीड आणि हिंगोली जिल्ह्यात ही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आज विजा आणि मेघदगर्जनेसह काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला. तर रात्रीची उष्णताही जास्त राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केल. 

अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर उद्यापासून राज्यात हवामान कोरडे राहू उन्हाचा चटका वाढेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Roads Issue: माजलगावच्या २०५ किलोमीटर शेतीपोच रस्त्यांची दुरवस्था

Dairy Farming Training: पशुपालन, दुग्धव्यवसाय व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी ४२ शेतकरी गुजरातला रवाना

Agricultural Land: शेतजमीनधारकांना मोठा दिलासा! शर्तभंग नियमित करण्याबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय

Water Supply Issues: तांत्रिक त्रुटी दूर केल्याशिवाय वेळेवर पाणीपुरवठा अशक्य : डॉ. राजेंद्र दाते पाटील

Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?

SCROLL FOR NEXT