Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन पुन्हा वाढले; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात झाली वाढ

Maharashtra Weather Forecast: राज्यात तापमानाचा पारा झपाट्याने चढत असून उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भ, मराठवाडा, कोकणसह राज्यातील बहुतांश भागांत दुपारचे तापमान वाढले आहे. हवामान विभागाने कोकणासाठी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

Anil Jadhao 

Pune News: सकाळी हवेत गारवा जाणवत असला तरी दुपारचे तापमान असह्य होत आहे. दुपारच्या तापमानात पुन्हा वाढ झाली. राज्यभरातील तापमान वाढले आहे. विदर्भासह मराठवड्यातील तापमान चांगले वाढले तर कोकणात हवामान विभागाने पुढील ५ दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट दिला. 

राज्यात तीन दिवस उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह आल्याने तापमानात घट झाली होती. त्यामुळे तापमानही कमी झाले होते. आजही सकाळच्या वेळी अनेक ठिकाणी हवेत गारवा जाणवला. मात्र दुपारच्या तापमानात कालपासून वाढ झाली.

राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद यवतमाळ येथे झाली. यवमाळ मध्ये आज सकाळपर्यंतच्या गेल्या २४ तासांमध्ये ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९ अंश सेल्सिअस तापमान होते.

राज्यात सर्वच भागांमध्ये तापमान चांगलेच वाढले. पालघर येथेही ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सोलापूर येथे ३८.८ अंश सेल्सिअस तापमान होते. तसेच अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, सांगली, रत्नागिरी, मोहोळ आणि जेऊर येथे ३७ अंशाच्या वर तापमान होते.

कोकणातील काही भागात आजही उष्ण आणि दमट हवामान होते. तर पुढील ४ दिवस सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच राज्यातील तापमानात काहीसे चढ उतार राहतील, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

Onion Price Crash: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश

Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका, पेट्रोल- डिझेल ३ रुपयांनी महागले

Red Chilli Farming: लाल मिरची उत्पादनात प्रसिद्ध झालेले कापसी

SCROLL FOR NEXT