Rain Alert Agrowon
हवामान

Climate Change: विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा

Maharashtra Weather Alert: राज्यात उन्हाच्या तीव्रतेसोबतच काही भागांत वादळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट तर गोंदिया, गडचिरोली, नागपूर, धाराशिव आणि लातूरमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात उन्हाचा चटका कायम असतानाच, मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २२) विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने, तसेच कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

मध्य प्रदेशात चक्राकार वारे वाहत असून, बंगालच्या उपसागरात केंद्र भागाकडून बाहेरच्या दिशेने वारे फिरणारी प्रणाली (एन्टी सायक्लोन) असल्याने पूर्व आणि मध्य भारतात वाऱ्यांचा संगम होत आहे. या प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. गुरुवारी (ता. २०) सायंकाळनंतर मराठवाड्यात वादळी पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे ३० मिलिमीटर, शिरूर अनंतपाळ २० मिलिमीटर, उदगीर १० मिलिमीटर, तर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे २० मिलिमीटर आणि मुदखेड येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान, शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला आणि वर्धा येथे तापमान ४० अंशांच्या वर होते. जेऊर, सातारा, सोलापूर, धाराशिव, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात ढगाळ हवामान होत असल्याने उकाडा कायम आहे.

आज (ता. २२) विदर्भातील चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर गोंदिया, गडचिरोली, नागपूर, धाराशिव आणि लातूर वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. २१) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३६.५---१७.०

अहिल्यानगर---निरंक---१७.४

धुळे---३७.५---१८.०

जळगाव---३७.४---२०.६

जेऊर---३९.५---१८.०

कोल्हापूर---३७.०---२२.७

महाबळेश्‍वर---३२.६---१८.४

मालेगाव---३८.२---१९.४

नाशिक---३४.४---१७.४

निफाड---३५.५---१२.८

सांगली---३७.७---२१.८

सातारा---३७.५---२०.२

सोलापूर---३९.५---२५.१

सांताक्रूझ---३६.२---२२.७

डहाणू---३३.५---२१.४

रत्नागिरी---३४.२---२२.३

छत्रपती संभाजीनगर---३७.०---२०.४

धाराशिव---३९.२---२३.२

परभणी---३८.४---२१.८

परभणी (कृषी)---३७.८---२०.३

अकोला---४०.०---२३.३

अमरावती---३८.२---२०.७

भंडारा---३७.०---२३.४

बुलडाणा---३६.६---२४.४

ब्रह्मपुरी---३९.६---२४.०

चंद्रपूर---३९.०---निरंक

गडचिरोली---३७.४---२१.०

गोंदिया---३६.४---२३.०

नागपूर---३८.६---२३.०

वर्धा---४०.०---२४.५

वाशीम---४०.४---निरंक

यवतमाळ---३९.२---२४.०

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२१.०---४०.४

मराठवाडा---२०.३---३९.२

पश्‍चिम महाराष्ट्र---१७.०---३९.५

उत्तर महाराष्ट्र---१२.८---३८.२

कोकण---२१.४---३६.२

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : चंद्रपूर, यवतमाळ.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : गोंदिया, गडचिरोली, नागपूर, धाराशिव लातूर.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) : ठाणे, मुंबई.

४० अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : वाशीम ४०.४, अकोला ४०, वर्धा ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT