Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : मध्य महाराष्ट्र, कोकणात आज गारपिटीचा इशारा

राज्यात वादळी पावसाचा अंदाज; उन्हाचा चटका वाढला

Team Agrowon

Pune Weather News : वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain) सुरू असतानाच राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान चाळिशीपार गेले आहे.

आज (ता. १३) मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात वादळी पावसासह गारपीट (Hailstorm) , तर उर्वरित राज्यातही वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तापमान चाळिशीपार गेल्याने उन्हाचा चटका असह्य होत आहे. उकाड्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

जळगाव, ब्रह्मपुरी येथे तापमान ४१ अंशांपेक्षा अधिक होते. तर वर्धा, सोलापूर, परभणी, धुळे येथे पारा ४० अंशांपार पोचला होता. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान होते.

आग्नेय अरबी समुद्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर सक्रिय होती.

तर पूर्व विदर्भापासून, मराठवाडा, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. खंडित वारे वाहत आहेत.

या पूरक स्थितीमुळे आज (ता. १३) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बुधवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३८.६ (२०.२), जळगाव ४१.६ (२६.८), धुळे ४०.० (२०.४), कोल्हापूर ३७.५ (२३.७), महाबळेश्वर ३१.१ (१९.०), नाशिक ३८.५ (२०.०), निफाड ३८.१(१९.०), सांगली ३७.९ (२३.६), सातारा ३८.१ (२१.०), सोलापूर ४०.६ (२३.४), सांताक्रूझ ३६.२ (२५.८), डहाणू ३४.० (२४.७), रत्नागिरी ३२.५ (२४.६), छत्रपती संभाजीनगर ३८.१ (२०.७), नांदेड ३८.४ (२५.४), परभणी ४०.२ (२४.५), अकोला ३९.९ (२३.३), अमरावती ३९.६(२३.७), बुलडाणा ३९.२ (२३.४), ब्रह्मपुरी ४१.० (२४.८), चंद्रपूर ४१.८ (२४.६), गडचिरोली ३६.४(२२.४), गोंदिया ३९.० (२२.२), नागपूर ३९.० (२४.०), वर्धा ४०.९(२४.२), वाशीम ३७.६ (२४.२), यवतमाळ ३९.५ (२४.०).

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :
चंद्रपूर ४१.८, जळगाव ४१.६, ब्रह्मपुरी ४१.०, वर्धा ४०.९, सोलापूर ४०.६, परभणी ४०.२, धुळे ४०.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड.
मध्य महाराष्ट्र : जळगाव, सांगली, सोलापूर,


मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT