Hailstorm  Agrowon
हवामान

Hailstorm Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा

उन्हाची ताप वाढल्याने कमाल तापमानाचा पारा हंगामात प्रथमच ४२ अंशांच्या पार गेला आहे. राज्यात वादळी पाऊस हजेरी लावत असतानाच उन्हाचा चटका आणि उकाडा असह्य होत आहे.

Team Agrowon

Weather Update : उन्हाची ताप वाढल्याने कमाल तापमानाचा (Temperature) पारा हंगामात प्रथमच ४२ अंशांच्या पार गेला आहे. राज्यात वादळी पाऊस (Rainfall) हजेरी लावत असतानाच उन्हाचा चटका आणि उकाडा असह्य होत आहे.

आज (ता. १४) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसासह, गारपिटीचा इशारा (Hailstorm) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यातही वादळी पावसाचा इशारा असून, उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. यातच उकाड्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

गुरूवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

ब्रह्मपूरी येथे ४२ अंश सेल्सिअस, तर जळगाव, सोलापूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, धुळे येथे तापमान ४१ अंशांच्या पुढे होते. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून ३६ ते ४० अंशांच्या दरम्यान होते.

नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

तर पूर्व विदर्भापासून, मराठवाडा, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, खंडीत वारे वाहत आहेत.

या पूरक स्थितीमुळे आज (ता. १४) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरूवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.८ (२१.२), जळगाव ४१.७ (२६.७), धुळे ४१.० (२२.०), कोल्हापूर ३८.७ (२३.८), महाबळेश्वर ३१.६ (२०.०), नाशिक ३७.८ (२४.४),

निफाड ३८.०(१७.५), सांगली ३८.६ (२४.४), सातारा ३९.३ (२२.६), सोलापूर ४१.६ (२६.५), सांताक्रूझ ३६.६ (२२.२), डहाणू ३४.७ (२२.२), रत्नागिरी ३६.० (२५.०),

छत्रपती संभाजीनगर ३९.२ (२३.३), नांदेड - (२७.४), परभणी ४०.७ (२५.४), अकोला ४१.१ (२३.६), अमरावती ४१.४(२२.५), बुलढाणा ३८.४ (२५.०), ब्रह्मपूरी ४२.० (२५.४),

चंद्रपूर ४२.२ (२७.०), गडचिरोली ३७.६(२०.६), गोंदिया ४०.४ (२२.८), नागपूर ३९.४ (२३.६), वर्धा ४१.१(२५.९), वाशीम ४०.० (२७.२), यवतमाळ ४१.० (२५.७).

शुक्रवारी (ता.१४) राज्यातील वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा दर्शविणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

मराठवाडा : परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT