Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Hailstorm Prediction : अकरा जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा अंदाज; राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीन दिवस किरकोळ पावसाची शक्यता

Maharashtra Hailstorm Forecast : राज्यातील बहुतांशी भागात थंडी कमी आहे. तर काही भागात पावसाला पोषक वातावरणाची निर्मिती होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील बहुतांशी भागात थंडी कमी आहे. तर काही भागात पावसाला पोषक वातावरणाची निर्मिती होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी गारपीटीला पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

गुरुवार ते शनिवार म्हणजेच २६ ते २८ डिसेंबर दरम्यान तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. तर तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, असा अंदाज श्री. खुळे यांनी स्पष्ट केला. त्यातही विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात व लगतच्या परिसरात पावसाची शक्यता अधिक जाणवते, असेही खुळे यांनी सांगितले.

सध्याच्या वातावरणीय घडामोडी पाहता शुक्रवारी दिनांक २७ डिसेंबरला संपूर्ण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात असे एकूण २५ जिल्ह्यांत तूरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये व लगतच्या परिसरात गारपीटीची शक्यता अधिक जाणवते, असाही अंदाज त्यांनी दिला.

agगारपीटीची शक्यता निर्माण होण्याला काही कारणे आहेत. २६ डिसेंबर दरम्यान देशात प्रवेशलेले प्रखर पश्चिम प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून व राजस्थानच्या आग्नेयला दिड ते दोन किलोमीटर उंचीपर्यंतच्या पातळीतील थंड कोरडे चक्रीय वाऱ्यांची, तसेच ८०० मीटर उंचीपर्यंतच्या खालच्या पातळीतील अरबी समुद्रातून नैरुत्य दिशेकडून आणि बंगालच्या उपसागरातून पूर्वे दिशेकडून आलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांची, अश्या तीन वाऱ्यांच्या टक्करीतून कमी उंचीवरच सांद्रीभवन घडून येऊ शकते. तोच घनीभवन होवून म्हणजेच थेट द्रविकरणाची स्टेज लगेचच ओलांडून घनीभवन होवून गारपीट होण्याची शक्यता निर्माण होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज राज्यातील काही भागात ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. तसेच बुधवारी आणि गुरुवारी ढगाळ वातावरणासह थंडी कमी होवून संपूर्ण महाराष्ट्रात ऊबदारपणा जाणवेल. मात्र वर्षाअखेरीस म्हणजे ३० डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होऊ शकते. त्यामुळे नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा करता येईल, असेही श्री. खुळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT