Hailstorm  Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा कायम

Hailstorm Forecast : सूर्य तळपू लागल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. विदर्भातील वाशीम येथे उष्णतेची लाट आली आहे.

अमोल कुटे

Pune News : सूर्य तळपू लागल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. विदर्भातील वाशीम येथे उष्णतेची लाट आली आहे. तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहेत. आज (ता. २३) विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह कोकणात ठाण्यात उष्ण हवामानाचा इशारा आहे.

मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ, वरील चक्राकार वारे, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आज (ता. २३) विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान ४० अंशांच्या पार असून, तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची वाढ झाल्याने वाशीम येथे उष्णतेची लाट आहे.

तर अकोला, धुळे, गडचिरोली, वर्धा येथे तापमान ४२ अंशांच्या वर आहे. आज (ता. २३) मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.

सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३७.८, धुळे ४२.०, जळगाव ३९.२, कोल्हापूर ३७.०, महाबळेश्वर २९.९, मालेगाव ३९.२, नाशिक ३६.१, निफाड ३७.३, सांगली ३८.५, सातारा ३८.७, सोलापूर ३९.२, सांताक्रूझ ३३.८, डहाणू ३४.९, रत्नागिरी ३४.५,

छत्रपती संभाजीनगर ३८.२, परभणी ४०.२, अकोला ४२.२, अमरावती ४१.४, बुलडाणा ३७.६, ब्रह्मपुरी ४१.८, चंद्रपूर ४१.४, गडचिरोली ४२.०, गोंदिया ३९.८, नागपूर ४०.६, वर्धा ४२.०, वाशीम ४३.६, यवतमाळ ४०.५.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

वाशीम ४३.६, अकोला ४२.२, धुळे ४२, गडचिरोली ४२, वर्धा ४२.

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) :

नागपूर, वर्धा, यवतमाळ.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT