Weather Forecast Agrowon
हवामान

Rain Alert: विदर्भात गारपीटीचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Vidarbha Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. मराठवाडा आणि विदर्भात आजपासून काही भागात हलक्या पावासाचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. मराठवाडा आणि विदर्भात आजपासून काही भागात हलक्या पावासाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी गारपीटीचाही अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातही दोन दिवसांमध्ये पावसाला पोषक हवामान होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

विदर्भात आजपासून काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि गोंंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज आहे. तसेच विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवमाळ जिल्ह्यात पुढील ४ ते ५ दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. वाशीम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी शनिवारी आणि रविवारी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, बीड जिल्ह्यात उद्यापासून तीन ते चार दिवक काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर जिल्ह्यात रविवार ते मंगळवार असे तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे.

नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे तसेच सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यात उद्यापासून २ ते ३ दिवस काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT