Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain: आजही ३ जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण;  नेमका कुठे पडणार पाऊस?

Weather Update : हवामान विभागने आजही विदर्भ आणि मराठवड्यातील काही ठिकाणी गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात अनेक ठिकाणी मागील तीन दिवस वादळी पाऊस आणि गारपीटीने चांगलेच झोडपले. याचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला. हवामान विभागने आजही विदर्भ आणि मराठवड्यातील काही ठिकाणी गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा दिला. 

हवामान विभागाने आज विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह विदळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

तसेच सिंधुदूर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडणा, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली. 

उद्या म्हणजेच शुक्रवारी संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. तसेच सांगली, नगर आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज आहे. 

रविवारी विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवड्यातील लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने सांगितले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

Subsidized Electricity Scheme: कृषिपूरक व्यवसायांना लवकरच सवलतीच्या दराने वीज

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

SCROLL FOR NEXT