Cold Weather Agrowon
हवामान

Cold weather Update : किमान तापमानात घट होण्याची शक्यता ; गारठा वाढणार

Winter Season News : ढगाळ हवामान झाल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे. किमान तापमानात वाढ होत पारा १० अंशांच्या वर गेला आहे.

अमोल कुटे

Pune News : ढगाळ हवामान झाल्याने राज्यात गारठा कमी झाला आहे. किमान तापमानात वाढ होत पारा १० अंशांच्या वर गेला आहे. आजपासून (ता. १३) ढगाळ हवामान दूर होत आकाश स्वच्छ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात हळूहळू घट होत गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर भारतात १४० नॉट्स वेगाने पश्‍चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत येत आहेत.

त्यामुळे थंडी कमी-अधिक होत असून, जमिनीलगत दाट धुक्याचे साम्राज्य दिसून येत आहे. रविवारी (ता. १२) बिहारच्या देहरीमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दोन दिवसांपासून राज्याच्या बऱ्याच भागात सकाळी उशिरापर्यंत धुके पाहायला मिळत आहे. यातच अंशतः ढगाळ हवामानामुळे झाल्याने गारठा कमी झाला आहे. रविवारी (ता. १२) धुळे ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १० अंशांच्या पुढे गेले आहे.

रविवारी (ता. १२) सकाळपर्यंच्या २४ तासांत रत्नागिरी येथे ३१.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. १३) राज्यात स्वच्छ हवामान होण्याची शक्यता असून, उद्यापासून (ता. १४) किमान तापमानात घट होत गारठा हळूहळू वाढण्याची शक्यता हवामान वर्तविली आहे.

रविवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---२९.२---१५.५

अहिल्यानगर---२६.९---निरंक

धुळे---२९---९.४

जळगाव---२९---१३

जेऊर---२९.५---१६

कोल्हापूर---२९.१---१९.१

महाबळेश्वर---२५.५---१४.४

मालेगाव---२३.५---१४.५

नाशिक---२८.३---१४.१

निफाड---२७.४---१२.३

सांगली---२९.४---१९.२

सातारा---२९.७---१७

सोलापूर---३१---२०.४

सांताक्रूझ---३०.२---१६.८

डहाणू---२८---१७.६

रत्नागिरी---३१.७---१९.३

छत्रपती संभाजीनगर---२७.५---१६.५

धाराशिव---२८.६---१५.२

परभणी---२९.५---१७.८

परभणी (कृषी)---२९.४---११

अकोला---३०.२---१८

अमरावती---२९.६---१६.९

भंडारा---२८.४---१४

बुलडाणा---२८.३---१७

ब्रह्मपुरी---३१.२---१४.४

चंद्रपूर---२८.८---निरंक

गडचिरोली---२८.६---१३.२

गोंदिया---२९.६---१५.४

नागपूर---२८.७---१५.४

वर्धा---२८.२---१६.९

वाशीम---२८.६---१८.४

यवतमाळ---२९---१९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT