Rain Update Agrowon
हवामान

Rain Update : जुलै, सप्टेंबरमध्ये भारतात चांगला पाऊस

Rain Forecast : यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ स्थिती निवळून ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत.

Team Agrowon

Pune News : यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ स्थिती निवळून ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे यंदा पावसाळ्यात विशेषतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आशिया - पॅसिफिक इकॉनॉमिक को -ऑपरेशनच्या (अपेक) हवामान केंद्राने वर्तविला आहे.

‘अपेक’च्या हवामान केंद्राने भारतातील मॉन्सूनचा यंदाचा पहिल्या अंदाज वर्तवला आहे. मॉन्सूनच्या हंगामात विशेषतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीत भारतात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ स्थितीचे ‘ला-निना’ स्थितीत होत असलेल्या सहज संक्रमणाचे संकेत लक्षात घेता हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या अंदाजानुसार पूर्व आफ्रिका, अरबी समुद्र, भारत, बंगालचा उपसागर, इंडोनेशिया, कॅरिबियन समुद्र, उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिक, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण पॅसिफिक या प्रदेशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. पूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियाच्या काही प्रदेशांमध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक पर्जन्यमान अपेक्षित असल्याचे ‘अपेक’च्या हवामान केंद्राने म्हटले आहे.

या हवामान केंद्राने १५ मार्च रोजी एन्सो (एल निनो-सदर्न ऑसिलेशन) इशारा प्रणाली सुरू केली आहे. यानुसार एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी ‘ला-निना’ स्थितीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे धोरणकर्ते आणि भागधारकांना पुढील काही महिन्यांत ला-निना स्थितीशी संबंधित हवामानाचे आकृतिबंध आणि संभाव्य पर्यावरणीय परिणाम यांचे निरीक्षण करणे शक्य होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat GR : सप्टेंबरमधील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी १ हजार ३५६ कोटी रुपयांचे होणार वितरण; शासन निर्णय जारी

Monsoon Update: मॉन्सून देशाबाहेर

Maharashtra Rain Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

Organic Fertilizer : भरडधान्याच्या उत्पादकतेत जैविक निविष्ठांचे मोठे योगदान ः तायडे

Raju Shetti: चालू हंगामात उसाला प्रतिटन ३,७५१ रूपये विनाकपात पहिली उचल मिळावी, राजू शेट्टींनी कारखानदारांना दिली १० नोव्हेंबरची डेडलाईन

SCROLL FOR NEXT