Monsoon Rain Forecast Agrowon
हवामान

Monsoon 2025: जून महिन्यातही चांगला पाऊस; मराठवाड्यात यंदा जास्त पावसाचा अंदाज

IMD Forecast: हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार २०२५ चा मॉन्सून राज्यात दमदार ठरणार आहे. जून महिन्यातच सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे.

Anil Jadhao 

Pune News: देशात यंदा माॅन्सून चांगला बरसणार आहे. जून महिन्यात देशात सरासरीच्या १०८ टक्के पावसाचा अंदाज आहे. पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असलेल्या भागातही यंदा चांगला पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रातील मराठवाड्यात सर्वाधिक सरासरीच्या ११२ टक्के पावसाचा अंदाज आहे. विदर्भात १०९ टक्के, मध्य महाराष्ट्रात ११० टक्के आणि कोकणात १०७ टक्के पावसाचा अंदाज आहे. राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाचा माॅन्सून हंगामाचा सुधारित अंदाज आज (ता.२७) हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी जाहीर केला. हवामान विभागाने माॅन्सून काळातील पावसाच्या अंदाजित टक्केवारित वाढ केली आहे. एप्रिल महिन्याच्या अंदाजात १०५ टक्के पावसाचा अंदाज होता. सुधारित अंदाजात हवामान विभागाने जून ते स्पप्टेंबर म्हणजेच माॅन्सून काळात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिला. 

माॅन्सून काळात देशात सरासरी ८७ सेंटीमीटर पाऊस पडत असतो. २०२५ च्या माॅन्सून हंगामात मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीच्या १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

पूर्व मध्य भारतातील राज्यांमध्ये माॅन्सून हंगामात सरासरी पावसाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाना, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात यंदा सरासरी पावसाचा अंदाज आहे. या राज्यांमध्ये सरासरीच्या ९२ ते १०८ टक्क्यांच्या दरम्यान पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तसेच बिहार, आसाम, अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅंड, मिझोराम, मनिपूर राज्यात सरासरीच्या ९४ टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. 

जूनमध्ये १०८ टक्के पाऊस

हवामान विभागाने जून महिन्यात देशात सरासरीच्या १०८ टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. दक्षिण कर्नाटक, केरळ, ईशान्य भारतातील राज्ये आणि लडाख तसेच राजस्थानधील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मात्र महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. 

महाराष्ट्रात चांगला पावसाळा

संपूर्ण माॅन्सून हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर काळात महराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात सरीसरीच्या १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. माॅन्सून काळात राज्यात यंदा मराठवाड्यात सर्वाधिक सरासरीच्या ११२ टक्के पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात ११० टक्के, विदर्भात १०९ टक्के आणि कोकण तसेच गोव्यात १७ टक्के पावसाचा अंदाज आहे. तर जून महिन्यातही राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. जून महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर काही भागात सरासरी पाऊस राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT