Maharashtra Monsoon Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार ? उद्या विदर्भ, मराठवड्यात ठिकठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज

IMD Rain Alert in Maharashtra : गुरुवारी राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली.

अनिल जाधव

Maharashtra Weather Update : राज्याच्या काही भागात पाऊस पडतो. उद्यापासून राज्यातील पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच गुरुवारी राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली.

राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. पण हा पाऊस सार्वत्रिक नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वदूर जोरदार पावसाची आजही प्रतिक्षा आहे. हवामान विभागाने उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला दिला.

यासोबत उद्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

गुरुवारी राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. गुरुवारी संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला. तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT