Monsoon Forecast Agrowon
हवामान

Monsoon In Kerala: खूशखबर; माॅन्सून २७ मे रोजी केरळमध्ये येणार

Monsoon 2025 Update: भारतीय हवामान विभागाने यंदा मॉन्सून २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचे सांगितले असून, जून-सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सून देशात यंदा वेळेआधी दाखल होणार आहे. माॅन्सून केरळमध्ये २७ मे रोजी डेरेदाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. पोषक हवामान असल्याने माॅन्सून वेळेच्या आधी देशात येणार आहे. तसेच हवामान विभागाने यंदा माॅन्सून काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०५ टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आणि वेळेआधी माॅन्सून दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. 

माॅन्सून केरळमधून देशात प्रवेश करतो. तसेच केरळमध्येच माॅन्सून जमिनीवर येतो. माॅन्सून केरळमध्ये कधी येतो त्यावरून देशातील वाटचालही ठरते. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर माॅन्सून उत्तरेच्या दिशेने वाटचाल करतो. केरळमध्ये माॅन्सून दाखल होण्याची सरासरी वेळ १ जून आहे. मात्र, मागील ५ वर्षांमध्ये माॅन्सून ३ वर्षे सरासरी वेळेपेक्षा उशीरा देशात दाखल झाला. तर २ वर्षे माॅन्सून वेळेच्या आधी देशात आला. यंदाही सरासरी वेळेच्या जवळपास एक आठवडा आधी माॅन्सून येणार आहे. 

माॅन्सूची केरळमध्ये आगमनाची वेळ ६ परिमानांवरून ठरविली जाते. त्यात वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पावर पूर्व मोसमी पावसाचे वाढलेले प्रमाण, प्रशांत महासागरातील वायव्य भागातील समुद्रसपाटीवरील हवेचे दाब, दक्षिण चीन समुद्रातून बाहेर पडणारे किरणोत्सर्ग, ईशान्य हिंद महासागरातील हवेच्या खालच्या थरातील वाऱ्याचे प्रवाह आणि इंडोनेशियातील हवेच्या वरच्या थरातील वाऱ्याचे प्रवाह, हे परिमाण वापरले जाते. 

देशात यंदा चांगल्या पावसाचा अंदाजही देण्यात आला. यंदा  मॉन्सून हंगामात, जून ते सप्टेंबर या कालावधीत १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. राज्यात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

मागील ५ वर्षात केरळमध्ये माॅन्सूनचे आगमन झालेली वेळ
२०२०…१ जून
२०२१…३ जून
२०२२…२९ मे
२०२३…८ जून
२०२४…३० मे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT