Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यात उष्णतेची लाट आणि पावसाचेही वातावरण

Anil Jadhao 

Pune News : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. तर काही भागात ढगाळ वातावरणासह पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी गारपीटही होत असल्याचे दिसते. हवामान विभागाने पुढील पाचही दिवस वेगवेगळ्या भागात गारपीट, पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. 

हवामान विभागाने आज रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला.

तर काही ठिकाणी गारपीट होईल, असाही अंदाज दिला. तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

उद्या रत्नागिरी, रागयगड, ठाणे, मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. तर नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

रविवारी मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मंगळवारीही राज्यात ठिकठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT