Rain Prediction Agrowon
हवामान

Rain Prediction : राज्यात विजांसह पावसाचा अंदाज

वादळी पाऊस, गारपिटीने राज्याच्या विविध भागात तडाखा दिला आहे. कमाल तापमानात घट झाली असली तरी किमान तापमान आणि उकाड्यात वाढ झाली आहे.

Team Agrowon

Weather Update Pune वादळी पाऊस, गारपिटीने (Hailstorm) राज्याच्या विविध भागात तडाखा दिला आहे. कमाल तापमानात घट झाली असली तरी किमान तापमान आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. १०) विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (Rain Forecast) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

ढगाळ हवामान, पावसाची हजेरी यामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर निफाड येथे ३७, जळगाव येथे तापमान ३६.५ अंशावर पोचले होते. उर्वरीत राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान २८ ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा वाढून १५ ते २५ अंशांच्या दरम्यान होते.

आग्नेय राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान आहे.

आज (ता. १०) विदर्भात जोरदार वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.९ (१९.७), जळगाव ३६.५ (२१.७), धुळे ३५.५ (१७.४), कोल्हापूर ३४.६ (२२.९), महाबळेश्वर २७.८ (१७.५), नाशिक ३४.३ (१९.७),

निफाड ३७.०(१७.२), सांगली ३४.९ (२२.२), सातारा ३२.२ (२१.७), सोलापूर ३६.४ (२२.५), सांताक्रूझ ३६.५ (२५.५), डहाणू ३६.३ (२४.५), रत्नागिरी ३७.३ (२५.१),

छत्रपती संभाजीनगर ३१.५ (१९.६), नांदेड - (२३.२), परभणी ३१.५ (२२.६), अकोला ३१.६ (२१.९), अमरावती ३०.०(२०.५), बुलढाणा ३०.५ (१९.८), ब्रह्मपूरी ३१.४ (२२.४), चंद्रपूर ३५.० (२४.०),

गडचिरोली ३४.०(२०.८), गोंदिया २८.६ (२१.५), नागपूर २९.२ (२०.३), वर्धा २७.९(२१.६), वाशीम ३०.४ (२०.२), यवतमाळ २९.५ (१९.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT