Monsoon Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज; कायम  माॅन्सूनने आणखी काही भागातून माघार घेतली

Anil Jadhao 

Pune News : राज्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर माॅन्सून देशातून पुढील २ दिवसात देशाचा निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागाने दिला. तर दुसरीकडे दुपारी उन्हाचा चटका चांगलाच वाढलेला दिसत आहे. 

माॅन्सूनने बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातून माघार घेतली. माॅन्सूनने उत्तर आणि ईशान्य भारताच्या बहुतांशी भागातून माघारी फिरला आहे. माॅन्सून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा राज्याच्या बहुतांशी भागातून माॅन्सून माघारी फिरला. पुढील २ दिवसात माॅन्सून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या उरलेल्या भागातून आणि महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघारी फिरेल. तसेच माॅन्सून देशातून २ दिवसात देशातून माघारी फिरेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर तसेच विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. 

तर उद्या कोकणातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यात तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

बुधवारी आणि गुरुवारी विदर्भात पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. शुक्रवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mustard Cultivation : सुधारित पद्धतीने मोहरी लागवड

Chana Cultivation : हरभरा लागवडीसाठी निवडा सुधारित वाण

Monsoon : देशातून मॉन्सून परतला...

Kolhapur Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यात डझनभर साखर कारखानदार उतरणार विधानसभेच्या रिंगणात, गळीत हंगामावर परिणामाची शक्यता

Karnataka Sugarcane Frp : कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांची एफआरपी ३९०० पार

SCROLL FOR NEXT