Weather Agrowon
हवामान

Maharashtra Rain: उद्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज ; राज्यात पुढील काही दिवस अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता

Weather Update : महाराष्ट्रात हवामान सध्या कोरडे असून सकाळी थंडीचा कडाका जाणवत आहे. हवामान विभागाने देशातील काही भागात उद्यापासून पावसाचा अंदाज दिला आहे.

Team Agrowon

Pune News: उत्तर भारतात थंडी कायम आहे. तर महाराष्ट्रात हवामान सध्या कोरडे असून सकाळी थंडीचा कडाका जाणवत आहे. हवामान विभागाने देशातील काही भागात उद्यापासून पावसाचा अंदाज दिला आहे.

उत्तर भारतातील अनेक भागात किमान तापमान कायम होते. तर पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात किमान तापमान ५ अंश सेल्सिअस ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

राजस्थानमधील सिकर येथे आज सर्वात कमी २.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच पंजाब आणि हरियानातील काही ठिकाणी थंडीची लाटही होती. देशाच्या मध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.

या स्थितीमुळे १० आणि १४फेब्रुवारी दरम्यान मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

तर मध्य प्रदेश आणि मराठवड्यात १० आणि ११ तारखेला हलक्या पावसाचा अंदाज काही ठिकाणी देण्यात आला. तर राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातारणाचीही शक्यता या काळात असेल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT