Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : राज्याच्या तापमानात चढ-उतार शक्य

Weather News : राज्यात मार्च महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३४ अंशापार असतानाच उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात मार्च महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३४ अंशापार असतानाच उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले आहे. आज (ता. ५) राज्यात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला. यातच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका, उकाडा चांगलाच वाढल्याने घामटा निघाला. सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३५ अंशांच्या पार आहे.

मध्य महाराष्ट्रातील धुळे येथे नीचांकी ८ अंश, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.२ अंश आणि साताऱ्यामध्ये १० अंश तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाली आहे. यातच मध्य प्रदेशपासून विदर्भ, तेलंगण, कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामान आहे. आज (ता.५) चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.४ (१३.०), धुळे ३१.० (८.०), जळगाव ३०.३ (१३.२), कोल्हापूर ३३.६ (१८.७), महाबळेश्वर २६.१ (१४.२), मालेगाव ३७.४ (१४.२), नाशिक २७.८ (१२.४), निफाड २८.० (८.२), सांगली ३४.० (१८.९), सातारा ३३.२ (१०.०), सोलापूर ३५.७ (२१.०), सांताक्रूझ २८.८ (१७.९), डहाणू २६.२ (१६.१), रत्नागिरी ३१.४ (१९.६),

छत्रपती संभाजीनगर ३१.८ (१४.२), नांदेड ३४.४ (२१.४), परभणी ३४.४ (१९.०), अकोला ३४.२ (१७.५), अमरावती ३३.६ (१८.७), बुलडाणा ३३.८ (१५.०), ब्रह्मपुरी ३६.४ (२३.०) चंद्रपूर ३६.८ (२०.२), गडचिरोली ३४.८ (१९.०), गोंदिया ३३.८ (२०.६), नागपूर ३५.० (२१.६), वर्धा ३५.० (२१.०), वाशीम ३५.४ (१५.६), यवतमाळ ३५.० (१७.७).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT