Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

Weather Forecast : डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावल्याने राज्यातील थंडी गायब झाली आहे. राज्यात पहाटे धुके पडत असून, किमान तापमानात हळूहळू घट होत आहे.

अमोल कुटे

Pune News : डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावल्याने राज्यातील थंडी गायब झाली आहे. राज्यात पहाटे धुके पडत असून, किमान तापमानात हळूहळू घट होत आहे. दुपारच्या वेळी काहीसा उकाडा जाणवत आहे. आज (ता. २) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी अधिक होत आहे. बुधवारी (ता. १) हरियानातील हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात थंडी कमी झाली असून काही ठिकाणी धुके आणि दव पडल्याचे दिसून येत आहे. बुधवारी (ता. १) धुळे येथील कृषी महाविद्यालयात येथे नीचांकी १२.५ अंश तापमान नोंदले गेले.

राज्यात १५ अंशाच्या पार गेलेला किमान तापमानाचा पारा हळूहळू खाली येत आहे. आज (ता. २) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. किमान तापमानात घट असली तरी कडाक्याच्या थंडीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

बुधवारी (ता. १) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.४ (१४.९), अहिल्यानगर ३०.८ (१४.७), धुळे ३०.५ (१२.५), जळगाव ३०.५ (१३.०), जेऊर ३२.५ (१५.५), कोल्हापूर ३०.८ (१८.१), महाबळेश्वर २५.९ (१४.५), मालेगाव २८.० (१७.४), नाशिक ३०.९ (१५.५), निफाड २८.७ (१३.२), सांगली ३२.१ (१७.६), सातारा ३१.९ (१६.१), सोलापूर ३३.२ (१८.९), सांताक्रूझ ३४.२ (२०.५), डहाणू २८.२ (१९.८), रत्नागिरी ३५.५ (२०.४), छत्रपती संभाजीनगर ३०.२ (१६.०),

धाराशिव ३०.९ (१५.६), परभणी ३१.१ (१७.१), परभणी कृषी विद्यापीठ ३१.० (१६.२), अकोला ३२.२ (१७.५), अमरावती ३०.८ (१५.७), भंडारा २८.० (१४.४), बुलडाणा २९.० (१६.६), ब्रह्मपुरी ३२.२ (१४.४), चंद्रपूर ३१.२ (-), गडचिरोली ३०.० (१५.८), गोंदिया २८.४ (११.९), नागपूर ३०.१ (१४.३), वर्धा ३०.९ (१५.८), वाशीम ३०.४ (१८.२), यवतमाळ ३०.५.

शुक्रवारी (ता. ३) सकाळी ५.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशातील किमान तापमानाचा अंदाज दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)

पिवळ्या व लाल रंगछटा - १४ अंशांपेक्षा अधिक तापमान

हिरव्या रंगछटा - ८ ते १२ अंश तापमान

निळ्या रंगछटा - ८ अंशापेक्षा कमी तापमान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT