Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

Weather Forecast : आजपासून (ता. १३) राज्यात गारठा कायम राहणार असला, तरी किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी पारा घसरल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढला आहे. गुरुवारी (ता. १२) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यात नीचांकी ५.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. आजपासून (ता. १३) राज्यात गारठा कायम राहणार असला, तरी किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मनारच्या आखातामध्ये ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, आज (ता. १३) दक्षिण तमिळनाडूकडे येताना या प्रणालीची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. यातच पश्‍चिमी चक्रावात आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतच आहे.

गुरुवारी (ता. १२) पूर्व राजस्थानच्या ‘सिकार’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील हंगामातील नीचांकी १ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातही गारठा टिकून असल्याने धुळ्यासह परभणी (कृषी), निफाड, गोंदिया, नागपूर येथे तापमान १० अंशांच्या खाली आले आहे.

गुरुवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.६ अंश तापमानाची नोंद झाली. दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असला तरी सूर्यास्तानंतर हवेतील गारठा अधिक वाढत आहे. राज्यात गारठा कायम असला, तरी आजपासून (ता. १३) किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.३ (१३.३), अहिल्यानगर २८.९ (११.५), धुळे २८ (५.८), जळगाव २८.८ (१०.२), जेऊर ३१ (११), कोल्हापूर २९.९ (१८.२), महाबळेश्‍वर २६.१ (१३.६), मालेगाव - (१३.६), नाशिक २९.४ (११.७), निफाड २७ (९.७), सांगली २९.४ (११.७), सातारा ३०.६ (१५.५), सोलापूर ३२.६ (१६.४), सांताक्रूझ ३५.६ (१८.४),

डहाणू ३५.१ (१७.४), रत्नागिरी ३५.१ (२१.६), छत्रपती संभाजीनगर २९.४ (१२), धाराशिव ३०.४ (१२), परभणी २९.४ (११.५), परभणी कृषी विद्यापीठ २८.५ (८.४), अकोला ३०.३ (१२.५), अमरावती २९.८ (११.४), भंडारा २७ (१३), बुलडाणा २८.५ (१३), ब्रह्मपुरी ३०.२ (११.८), चंद्रपूर २८.२ (११.८), गडचिरोली २८.२ (१०.८), गोंदिया २६.७ (९.८), नागपूर २८.४ (९.८), वर्धा २८.९ (१०.५), वाशीम ३२.८ (-), यवतमाळ २९ (-).

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे ५.८, परभणी (कृषी) ८.४, निफाड ९.७, गोंदिया ९.८, नागपूर ९.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Produce Processing: शेतकरी उत्पादकासोबत प्रक्रियादार, निर्यातदार व्हावा : मंत्री रावल

Irrigation For Agriculture : शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत पाणी मिळणे हीच प्राथमिकता

Blue Green Algae: भात पिकासाठी निळे-हिरवे शेवाळ ठरते फायदेशीर; नत्राची बचत करण्यासाठी मदत

Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता

Solapur ZP : ६८ सदस्य, ८५ कोटी निधी, तरीही गणित जुळेना

SCROLL FOR NEXT