Maharashtra Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात गारठा कमी-अधिक होण्याची शक्यता

Cold Weather : उत्तर महाराष्ट्रात पारा १० अंशांच्या खाली आला असतानाच राज्यात गारठा पुन्हा वाढला आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तर महाराष्ट्रात पारा १० अंशांच्या खाली आला असतानाच राज्यात गारठा पुन्हा वाढला आहे. आज (ता. २०) राज्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहून, किमान तापमानातील घट टिकून राहणार आहे. दोन दिवसांत किमान तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याने गारठा कमी-अधिक होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य उत्तर प्रदेशापासून राजस्थान पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वायव्य भारतात १३० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. पश्चिमी चक्रावातांच्या तीव्रतेनुसार थंडी सातत्याने कमी-अधिक होत आहे. रविवारी (ता. १९) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या अनेक भागात धुक्याची दुलई पहायला मिळत आहे. ढगाळ हवामान निवळताच किमान तापमानाचा पारा घसरला आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा १० अंशांच्या खाली घसरला असून, गारठा वाढला आहे. यातच दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. रविवारी (ता. १९) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

रविवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रूझ आणि रत्नागिरी येथे ३५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अंतर्गत महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तापमानातील घट कायम राहणार असून, किमान तापमानात पुन्हा काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. १९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---२९.७---१२.८

अहिल्यानगर---३०.९---११.४

धुळे---३०.०---८.५

जळगाव---३०.२---१३.०

जेऊर---३१.५---१२.५

कोल्हापूर---२९.२---१८.१

महाबळेश्वर---२५.१---१३.८

मालेगाव---२६.४---१५.०

नाशिक---२८.३---१४.३

निफाड---२९.५---९.५

सांगली---३०.९---१७.१

सातारा---३०.३---१४.९

सोलापूर---३१.९---१७.४

सांताक्रूझ---३५.१---१७.१

डहाणू---३४.०---१७.९

रत्नागिरी---३५.१---२१.३

छत्रपती संभाजीनगर---२९.०---१२.८

धाराशिव---२८.७---१५.०

परभणी---२९.९---१३.२

परभणी (कृषी)---२९.२---१०.४

अकोला---३०.५---१४.१

अमरावती---३०.८---१५.१

भंडारा---२७.६---१४.४

बुलढाणा---२९.८---१४.४

ब्रह्मपूरी---३२.२---१२.४

चंद्रपूर---३०.०---निरंक

गडचिरोली---२९.४---१३.६

गोंदिया---२९.२---१२.०

नागपूर---३०.०---१०.४

वर्धा---२९.८---१२.४

वाशीम---२९.६---१८.६

यवतमाळ---२८.५---१७.०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT