Cold Weather Agrowon
हवामान

February Hawaman Andaj: फेब्रुवारी महिन्यातही थंडीचा कडाका कमीच राहणार; तापमान जास्त राहण्याचा अंदज

Weather Update : यंदाच्या हिवाळ्यात राज्यात थंडी कमीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. फेब्रुवारी महिन्यातही देशात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

अनिल जाधव

Pune News : यंदाच्या हिवाळ्यात राज्यात थंडी कमीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. फेब्रुवारी महिन्यातही देशात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच थंडी कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. फेब्रुवारीमध्ये कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे. तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यातील तापमान आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा यांनी आज जाहीर केला. देशाच्या बहुतांशी भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

तसेच देशभरात थंडीच्या लाटांचा कालावधी कमी राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा, तर कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे.

यंदाच्या हिवाळ्यात डिसेंबर महिन्यातच फक्त गुलाबी थंडीचा अनुभव आला. जानेवारी महिन्यात तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली. राज्यात अनेक भागात सातत्याने ढगाळ हवामानाचा अनुभव येत आहे.

त्यामुळे थंडी कमी होती. जानेवारीत थंडी कमी जाणवल्याने फेब्रुवारी महिन्यात थंडी चांगली, राहील अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. मात्र हवामान विभागाच्या अंदाज आता काहीशी चिंता वाढली आहे.

प्रशांत महासागरात सध्या सौम्य ला- निना स्थिती असून, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. एप्रिल महिन्यापर्यंत सौम्य ला-निनो स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर हळूहळू निवळण्याची शक्यता आहे. इंडियन ओशन डायपोल (आयओडी) तटस्थ स्थितीत असून, पुढील दोन महिन्यात ही स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT