Maharashtra Weather  Agrowon
हवामान

Maharashtra Weather Report : पावसाला पोषक हवामान

Weather Update : उद्यापासून (ता. २७) विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होत असून, उघडीप दिलेल्या पावसाला पुन्हा पोषक हवामान होत आहे. आज (ता. २६) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा ताप कायम राहण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. २७) विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वादळी पावसाने उघडीप देताच कमाल तापमानात वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पार आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३५.५ अंश तापमानाची नोंद झाली. तसेच सोलापूर आणि डहाणू येथे ३५ अंश तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला किमान तापमानात घट होत. किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.

आज (ता. २६) उन्हाचा चटका वाढून, कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे. तर उद्या (ता. २७) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. सोमवारपासून (ता. ८) राज्याच्या काही जिल्ह्यांत विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३२.८, अहिल्यानगर ३१.२, जळगाव ३४.२, कोल्हापूर ३०.८, महाबळेश्वर २८.५, मालेगाव ३१.२, नाशिक ३१.६, निफाड ३१.८, सांगली ३१.७, सातारा ३१.८, सोलापूर ३५.०, सांताक्रूझ ३५.५, डहाणू ३५.०, रत्नागिरी ३४.२, छत्रपती संभाजीनगर ३२.६, बीड ३१.०, परभणी ३३.४, अकोला ३३.३, अमरावती ३३.०, भंडारा ३०.०, बुलडाणा ३०.५, ब्रह्मपुरी ३३.२, चंद्रपूर ३३.६, गडचिरोली ३२.४, गोंदिया ३३.६, नागपूर ३२.६, वर्धा ३३.०, वाशीम ३२.८, यवतमाळ ३२.०.

‘डाना’ चक्रीवादळ निवळतंय

बंगालच्या उपसागरातील ‘डाना’ तीव्र चक्रीवादळ शुक्रवारी (ता. २५) पहाटे ओडिशाच्या भितरकणिका आणि धामरा जवळ धडकून जमिनीवर आले आहे. जमिनीवर येताच या चक्रीवादळाची तीव्रता ओसरू लागली आहे. ओडिशाच्या भद्रक पासून ५० किलोमीटर ईशान्येकडे, तर धामरापासून ५० किलोमीटर वायव्येकडे असलेली ही प्रणाली उत्तर ओडिशाकडे सरकताना निवळणार आहे.

३४ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे : सांताक्रूझ ३५.५, सोलापूर ३५, डहाणू ३५, रत्नागिरी ३४.२, जळगाव ३४.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT