Winter Season Agrowon
हवामान

Rainy Weather: राज्यात पावसाला पोषक हवामानाची निर्मिती

Winter Weather Update: किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडी कमी झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. आज (ता. ३०) राज्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची व किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News: किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यात थंडी कमी झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. आज (ता. ३०) राज्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची व किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

एकामागोमाग येणाऱ्या पश्चिमी चक्रवातांबरोबरच वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १४५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत असून, बुधवारी (ता. २९) हरियानातील नर्नूल येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात पहाटे धुक्याची चादर कायम आहे. किमान तापमान कमी-अधिक होत आहे. बुधवारी (ता. २९) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १३ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा घामटा काढत आहे.

बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जेऊर, सोलापूर, अकोला, ब्रह्मपुरी येथे पारा ३५ अंशांपार आहे. तसेच बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंशांच्या वर गेला आहे.

आज (ता. ३०) राज्यात आकाश ढगाळ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किमान तापमानात काहीशी घट होण्याची तर उर्वरित राज्यात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. शनिवारपासून (ता. १) पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. २९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३४.४---१५.९

अहिल्यानगर---३४.२---१४.७

धुळे---३२.०---१३.३

जळगाव---निरंक---१५.१

जेऊर---३५.०---१५.५

कोल्हापूर---३२.९---१९.३

महाबळेश्वर---२७.६---१७.१

मालेगाव---३२.२---१६.६

नाशिक---३४.२---१६.६

निफाड---३२.३---१२.२

सांगली---३३.४---१७.३

सातारा---३३.७---१५.८

सोलापूर---३५.८---२०.४

सांताक्रूझ---३३.८---१८.०

डहाणू---२८.२---१७.९

रत्नागिरी---३६.०---१९.४

छत्रपती संभाजीनगर---३४.२---१७.१

धाराशिव---३१.८---१४.६

परभणी---३४.४---१६.९

परभणी (कृषी)---३४.०---१३.१

अकोला---३५.५---१७.७

अमरावती---३४.०---१५.६

भंडारा---३२.४---१७.०

बुलडाणा---३४.०---१९.०

ब्रह्मपुरी---३५.१---१६.३

चंद्रपूर---३२.८---निरंक

गडचिरोली---३२.४---१५.६

गोंदिया---३१.२---१७.२

नागपूर---३२.८---१५.२

वर्धा---३४.०---१७.४

वाशीम---३४.०---२१.६

यवतमाळ---३४.५---२०.०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT