Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सून सक्रिय होण्याचे संकेत

Maharashtra Rain Alert : मॉन्सून सक्रिय होण्यासाठी पोषक हवामान होत असल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : मॉन्सून सक्रिय होण्यासाठी पोषक हवामान होत असल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. ६) सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट ) आहे. कोकण आणि पुर्व विदर्भात जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे सर्वाधिक ९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप असली तरी पुन्हा ढगाळ हवामान होऊ लागले आहे. कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान झाले आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीत कायम असून, राजस्थानच्या बिकानेर पासून, सिकार ओराई, चुर्क, दलतोंगंज, पुरुलिया ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. यातच पश्चिम राजस्थानपासून पासून मणिपूरपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा कायम आहे. गुजरात ते केरळ किनाऱ्यापर्यंत लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पश्चिम किनारपट्टीवर ढग जमा होऊ लागले आहेत.

आज (ता. ६) कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींचा आणि उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

गुरूवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :

कोकण :

रायगड : कर्जत ९३, खालापूर ६५, माथेरान ५४, पेण ८०, रोहा ८७, तळा ६७.

रत्नागिरी : मंडणगड ३४, राजापूर ३३, संगमेश्वर ३५, वाकवली ३३.

सिंधुदुर्ग : आवळेगाव ६८, दोडामार्ग ५०, कणकवली ४०, मुलदे (कृषी) ६१, सावंतवाडी ८३, वैभववाडी ४५.

ठाणे : भिवंडी ३६.

मध्य महाराष्ट्र :

नगर : पारनेर १८.

धुळे : शिरपूर १८.

जळगाव : भाडगाव ३२,

कोल्हापूर : चंदगड ५८, गगनबावडा ५७, राधानगरी २४, शाहूवाडी ३५.

नंदूरबार : अक्कलकुवा ३१, अक्रणी २२, शहादा २१, तळोदा ३२,

नाशिक : हर्सूल २६, इगतपुरी ४२, पेठ २८, त्र्यंबकेश्वर २०.

पुणे : लोणावळा कृषी ६३, वेल्हे ५१.

सातारा : महाबळेश्वर ७२.

मराठवाडा :

परभणी : गंगाखेड २०.

विदर्भ :

अकोला : बार्शीटाकळी १८,

अमरावती : अमरावती १९, बटकुली २४, चांदूर रेल्वे ३१, धामणगाव रेल्वे ३९, तिवसा ३५.

भंडारा : भंडारा ४०, मोहाडी ३१, तुमसर ३२.

बुलडाणा : लोणार २५.

गडचिरोली : चामोर्शी २५, एटापल्ली ३२, मुलचेरा २१.

गोंदिया : गोंदिया ३०, तिरोडा ४२.

नागपूर : काटोल २६.

वर्धा : हिंगणघाट ३१.

वाशिम : करंजालाड २५.

यवतमाळ : बाभुळगाव २५.

जोरदार पावसाचा इशारा ( ऑरेंज अलर्ट) :

सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT