Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: राज्यात दुपारी उन्हाचा चटका कायम; राज्यातील काही भागात सकाळी गारवाही टिकून

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात तापमानाचा लहरीपणा जाणवत आहे. सकाळी गारवा अनुभवायला मिळत असला तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका असह्य होत आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील बहुतांशी भागात तापमानात चढ उतार सुरु आहेत. यंदा फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. तापमान अनेक ठिकाणी ३५ अंशाच्या पुढे सरकले आहे.

आजही सोलापूर येथे ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर निफाड येथे ९.५ अंशाची नोंद झाली. राज्यातील तापमानातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उत्तर भारतातील अनेक भागात थंडीचा कडाका कायम दिसत आहे. तर काही ठिकाणी तापमान वाढलेले दिसत आहे. म्हणजेच उत्तर भारतातही तापमानातील चढ उतार कायम आहेत.

उत्तर भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १३० ते १४० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. आज पंजाबमधील आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातील किमान आणि कमाल तापमानातील तफावत कायम आहे. आजही सकाळी अनेक भागात चांगला गारवा जाणवला. मात्र दुपारी उन्हाचा चटका असह्य होत आहे. दुपारच्या वेळी राज्यातील बहुतांशी भागात तापमान वाढले आहे.

आज राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड येथील गहू संशोधन केंद्रात झाली. आज येथे ९.५ अंश सेल्सिअस तापमान होते. तर सर्वाधिक तापमान सोलापूर येथे ३६.६ अंश सेल्सिवर होते. राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Account Verification: शेतकऱ्यांच्या खात्यांची कर्जमाफीसाठी तपासणी

Monsoon In Kerala: आनंदघन केरळात

Onion Procurement Rules: कांदा खरेदीचे निकष शिथिल

Vidarbha Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Dahivadi Heavy Rain: दहिवडी परिसराला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT