Remal Cyclone Agrowon
हवामान

Monsoon Update : ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनची वेगाने चाल

Remal Cyclone : बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. रविवारी (ता. २६) बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनने मजल मारली आहे.

Team Agrowon

Pune News : बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. रविवारी (ता. २६) बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनने मजल मारली आहे. ‘रेमल’ चक्रीवादळ तीव्र झाले असून, रविवारी मध्यरात्री हे वादळ जमिनीवर येण्याची शक्यता होती. आज (ता. २७) पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात शनिवारी (ता. २५) सायंकाळी ‘रेमल’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. रविवारी तीव्र रूप धारण करणारे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या सागर बेटांपासून २१० किलोमीटर, तर कॅनिंगपासून २३० किलोमीटर दक्षिणेकडे उपसागरात घोंघावत होते.

ताशी ९५ ते ११५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणाऱ्या चक्रीवादळाचे केंद्र ताशी १३ किलोमीटर वेगाने जमिनीकडे सरकत होते. रविवारी मध्यरात्री ११.३० वाजेपर्यंत ताशी ११० ते १३५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह ही प्रणाली बांगलादेशातील खेपूपारा आणि मोंगला दरम्यान जमिनीवर येण्याचा इशारा होता.

चक्रीवादळ जमिनीला धडकल्यानंतर पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात सोमवारी (ता. २७) मध्य रात्रीपर्यंत त्याचा प्रभाव कायम राहणार आहे. या वादळामुळे किनारपट्टीय भागात जोरदार वादळी वारे वाहणार असून, समुद्र खवळून ३ ते ४ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे तसेच समुद्राला उधाण आल्याने सखल भागात पाणी साचून पूरस्थिती ओढवणार असून, जनजीवन विस्कळित होणार आहे.

‘वादळानंतर ठरणार मॉन्सूनची पुढील दिशा’

दरम्यान, वादळी प्रणालीमुळे चाल मिळाल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वाटचाल कायम ठेवली आहे. रविवारी (ता. २६) बंगालच्या उपसागराच्या मध्य आणि ईशान्य भागात मॉन्सूनने प्रगती केली. वादळी प्रणाली निवळल्यानंतर मॉन्सूनच्या पुढील वाटचालीची दिशा ठरणार आहे. यातच ३१ मे पर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT