Mocha Cyclone Agrowon
हवामान

Cyclone Mocha : ‘मोचा’ चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता

Weather Update : बंगालच्या उपसागरातील अतितीव्र ‘मोचा’ चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारकडे झेपावत आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : : बंगालच्या उपसागरातील अतितीव्र ‘मोचा’ चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारकडे झेपावत आहे. आज (ता. १४) दुपारपर्यंत हे अतितीव्र चक्रीवादळ दक्षिण बांगलादेश आणि उत्तर म्यानमारच्या किनाऱ्यावर असलेल्या सिटवेजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पूर्व किनारपट्टीपासून दूर जात असलेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर प्रभाव जाणवणार नाही. ‘मोचा’ चक्रीवादळ शनिवारी (ता.१३) ही प्रणाली पोर्ट ब्लेअरपासून ५६० किलोमीटर वायव्येकडे, बांगलादेशाच्या कॉक्सबाजार पासून ६३० किलोमीटर दक्षिणेकडे, म्यानमारच्या सिट्वेपासून ५५० किलोमीटर नैर्ऋत्येकडे होती.

अतितीव्र चक्रीवादळ आज (ता. १४) दुपारपर्यंत बांगलादेशाच्या कॉक्स बाजार आणि म्यानमारच्या 'क्याउक्प्यू' दरम्यान सिटवे जवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ किनारपट्टीलगत येताच या भागात प्रभावामुळे ताशी १७० ते २०० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता

‘मोचा’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ईशान्य भारतातील त्रिपुरा, मिझोराम, नागालँड, मणिपूर, पूर्व अरुणाचल प्रदेश व दक्षिण आसाम राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्र खवळून उंच लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT