Mocha Cyclone  Agrowon
हवामान

Cyclone Mocha : ‘मोचा’ चक्रीवादळ झाले अतितीव्र

Cyclone Mocha Update बंगालचा उपसागरात गुरुवारी (ता. ११) तयार झालेले ‘मोचा’ चक्रीवादळ अतितीव्र झाले आहे.

Team Agrowon

Mocha Cyclone Update : बंगालचा उपसागरात गुरुवारी (ता. ११) तयार झालेले ‘मोचा’ चक्रीवादळ अतितीव्र झाले आहे. बांगलादेश आणि म्यानमारकडे जाणारी ही प्रणाली उपसागरातून ईशान्येकडे सरकू लागली आहे.

उद्या (ता. १४) दुपारपर्यंत हे अतितीव्र चक्रीवादळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा प्रभाव जाणवणार नाही.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ तीव्रता वाढली आहे. शुक्रवारी (ता. १२) ही प्रणाली पोर्ट ब्लेअरपासून ५३० किलोमीटर पश्चिमेकडे, बांगलादेशाच्या कॉक्सबाजार पासून ९५० किलोमीटर दक्षिणेकडे, म्यानमारच्या सिट्वेपासून ८७० किलोमीटर नैॡत्यकडे होती.

अतितीव्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ताशी १५० ते १७५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले असून, रविवारी (ता. १४) दुपारपर्यंत बांगलादेशाच्या कॉक्स बाजार आणि म्यानमारच्या ‘क्याउक्प्यू’ दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.

‘मोचा’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी झाली आहे. या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या चक्रीवादळामुळे अंदमान निकोबार बेट समूह, ईशान्य भारतातील त्रिपुरा, मिझोराम, नागालँड, मणिपूर, पूर्व अरुणाचल प्रदेश व दक्षिण आसाम राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्र खवळून उंच लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT