Rain Agrowon
हवामान

Paus Andaj : उद्या चक्रीवादळाची निर्मिती होणार; राज्याच्या काही भागात दोन दिवस पावसाचा अंदाज

Rain Update : राज्यात काही ठिकाणी हलक्या आणि मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला.

Anil Jadhao 

Pune News : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाब क्षेत्राचे उद्या चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारी त्याचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात होऊन ओडिशा आणि पश्चिम बंगलाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी हलक्या आणि मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला.

पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ठळक कमी दाब क्षेत्राचे रुपांतर आज तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. ही स्थिती ओडिशाच्या पारादीपपासून आग्नेयला ७३० किलोमीटर तर पश्चिम बंगालमधील सागर बेटापासून नैऋत्येला ७७० किलोमीटर आणि बांगलादेशमधील खेपूपुरापासून दक्षिण आग्नेयला ७४० किलोमीटरवर आहे. हे तीव्र कमी दाब क्षेत्र ईशान्येला प्रवास करण्याची दाट शक्यता आहे. उद्या सकाळपर्यंत या तीव्र कमी दाब क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे.

तर २४ ऑक्टोबरला याचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. हे अतितीव्र चक्रीवादळ पुरी आणि सागर बेटाच्या दरम्यान २४ ऑक्टोबरला मध्य रात्री आणि २५ ऑक्टोबरला सकाळी ओडिशा आणि पश्चिम बंगालला धडकणार आहे. यावेळी ११० ते ११० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

तर हवामान विभागाने राज्यात आज आणि उद्या काही भागात पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या मध्य मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला. तर पालघर आणि मुंबईतही हलक्या पावसाचा काही ठिकाणी अंदाज देण्यात आला.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

उद्या कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तसेच पुणे, नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

July Rainfall: जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

Stamp Act Amendment: विकास करार रद्द झाल्यास मुद्रांक शुल्काचा परतावा मिळणार नाही; दुरुस्ती विधेयक विधानसभेत सादर

Milk Rate: दूधदर ५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

Women Empowerment: महिलांना प्रत्यक्ष हक्क, सन्मान, अधिकार मिळावा

Kharif Sowing: देशात खरिपाच्या पेरण्यांत २३ टक्क्यांची घट

SCROLL FOR NEXT